Wednesday, 26 April 2017

आर आर पाटील और ऐम आई पटेल आर.आर. पाटलांच्या पुण्यतिथीनिमित्त आर.आर.पाटील अर्थात आबा गेल्यानंतर पहिल्यांदा आठवली.. ‘मरने के बाद आदमी का क्या रह जाता है?’ शांतपणे विचार केल्यानंतर समजलं बरंच काही राहून जातं. आबा मूळचे अंजनीचे. जन्म 1957 सालचा. 4 एकर शेती. तीसुद्धा त्या काळात कोरडवाहूच. घरची गरीबी. किती टोकाची..? “तर आबांचा शर्ट फाटला होता. सुई-दोरा घेऊन ते आईकडे गेले, आणि म्हणाले की हा शर्ट कसातरी शिऊन दे. शर्टची अवस्था बघून आई म्हणाली आता कुटं शिवायचा? एकच शर्ट असल्यानं अंगावर काय घालायचं हा प्रश्न होताच. तेवढ्यात सहज आबांची नजर वर गेली. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे कपडे गाठोड्यात बांधून ठेवले होते. जुने कपडे आबांनी टेलरकडे नेले. गावातल्या टेलरनंही हे कपडे आबांच्या वडिलांचे असल्याचं लगेच ओऴखलं. त्याच्याकडून आबांनी सगळे कपडे आल्टर करुन घेतले. आपल्याकडे मेलेल्या माणसाचे कपडे खरंतर घालत नाहीत. पण देवाघरी गेलेल्या वडिलांचे कपडे घालून आबा घरात आले, तेव्हा आईला डोळ्यातलं पाणी रोखता आलं नाही. त्याही परिस्थितीत मुलांनी शिकावं म्हणून आई आग्रही होती” ( मी कसा घडलो.. या आबांच्या जीवनचरित्रातून )

No comments:

Post a Comment