Thursday, 6 July 2017

पहाटे तुळशीला पाणी का घालावे? आपल्या पुर्वासुरींनी पहाटे प्रत्येकाने तुळशीला पाणी घालावे असे सांगीतले आहे. त्यापाठीमागेपुढील महत्वाच कारण आहेत. वैज्ञानीक महत्व- जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन-O2 व रात्री कार्बन डाय ऑक्साईड-CO2 सोडते. अपवाद फक्त पिंपळ, कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन सोडतो. म्हणुनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, सर्व वृक्षात मी अश्वथ-पिंपळ आहे. मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डाय ऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका ओझोन-O3 वा़यु सोडते. व या वायुच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदुत 5HTPn-सेरॉटोनीन नावाचे संप्रेरक (Neurotransmiter) स्त्रवते. ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच त्याची रोग प्रतिकारक शक्ती (Immune System) बळकट होते.आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी, खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व किडनीचे विकार, कँन्सर, होत नाहीत. कारण तुळशीच्या बिया, मुळे, खोड, पाने, फुले (मंजिरी) हे सर्वच औषधी आहेत. शिवाय तुळशीतुन निघणाऱ्या शुभ स्पंदनांमुळे वातावरण शुद्धी होते. या सर्व बाबींचा गहन विचार करुनच पुर्वासुरींनी पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगीतले आहे. llइति सर्वेश्वरीचरणार्पणमस्तु... ज्याच्या घरची तुळस फुललेली असते, त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो. जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते, तिथे भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते. जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते. आणि…. जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते. लेख कसा वाटला? फार सुंदर आहे.....

No comments:

Post a Comment