Saturday, 12 November 2016
स्व. इंदिराजीं ............. Blood telegram या Gary Bass यांनी लिहिलेलं पुस्तक अवश्य वाचा. 1970-71 च्या काळात बांगलादेशात (तेव्हाचे पूर्व पाकिस्तान) Archer Blood हे अमेरिकन Counsel General होते आणि त्यांच्या तत्कालीन अमेरिकन परराष्ट्र खात्याशी झालेल्या पत्रव्यवहारावर आणि व्हाईट हाऊस च्या declassified ऑडिओ टेप्स वर आधारित पुस्तक आहे. अमेरिकन नजरेतून इंदिरा गांधी पाहायला मिळतील. त्यातील दोन प्रसंग इथे मुद्दाम सांगतो.... 1) युद्धपूर्वी इंदिराजी पाकिस्तान लष्कराच्या अत्याचार आणि याह्या खानच्या हुकूमशाही विरोधात जगभर जनमत तयार करत होत्या. स्वर्णसिंग हे मंत्री विशेषतः कार्यरत होते. नियोजित दौऱ्यावर इंदिराजी अमेरिकेत गेल्या. रिचर्ड निक्सन आणि हेन्री किसिंजर हे दोघे इंदिराजींचा अत्यंत द्वेष करत. व्हाईट हाउस च्या डिनरला निक्सन जगातल्या सर्व राष्ट्रांचे राजदूत आणि अमेरिकन सिनेटर याना मुद्दाम बोलावतात. सर्वांसमोर इंदिराजींचा पाणउतारा करायचा हे ठरवलेलं असतं. डिनर पूर्वी भाषणात toast करताना निक्सन अमेरिकेचं प्रभुत्व, अमेरिकेशी दुश्मनी घेतल्याचे दुष्परिणाम वगैरे अनेक विषय बोलून इंदिराजींवर दबाव आणण्यासाठी भाषण करतात. त्यांचे समर्थक जोरदार प्रतिसाद देतात, सर्वाना ते निक्सन यांचं सर्वोत्तम आणि आक्रमक भाषण वाटतं. त्या भाषणांनी आता इंदिराजी अत्यंत घाबरतील असं मत बनतं. भाषणाला उत्तर द्यायला इंदिराजी उभ्या राहतात आणि लेखकांनी लिहिलंय, "त्यानंतर सलग 40 मिनिट इंदिरा गांधी अमेरिकेच्या धोरण आणि नीतीला विवस्त्र करत होत्या. जगातल्या 20-21 देशांमधील अमेरिकेची लुडबुड, अत्याचार, पिळवणूक आणि शोषण त्यांनी स्पष्टपणे उघड मांडलं. किसिंजर यांना आठवण करून दिली कि तुम्ही स्वतः ज्यू असूनसुद्धा दुर्दैवाने हुकूमशाही अत्याचार, खून, बलात्कार या सर्व गोष्टी विसरला आहात. माझ्या देशात काही कोटी पीडित, अत्याचारग्रस्त निर्वासित आले आहेत आणि भारत त्यांना त्यांचा सन्मान, प्रतिष्ठा मिळवून देईल. सोबत असाल तर तुमच्या मदतीनं, नसाल तर एकटा भारत हे करेल". सर्व राजदूत, सिनेटर, अमेरिकन प्रेस हे स्तब्ध, थक्क झालेल्या अवस्थेत सोडून इंदिराजींनी जेवण केलं. 2) भारताने बांगलादेशात लष्कर पाठवून युद्ध सुरु केलं होतं. 8 दिवस उलटले होते. किसिंजर यांच्या सल्यावरून अमेरिकेन त्यांचं 7th fleet ला व्हिएतनाम जवळून बंगालच्या उपसागरात पाठवण्याचा आदेश दिला. अमेरिकेच्या भारतातील राजादूताने इंदिराजींना तसा निरोप पोहोचवला. आता तर इंदिरा गांधी solid घाबरणार आणि युद्धातून माघार घेणार याची खात्रीच अमेरिकेला वाटली. राजादूताने अमेरिकेत कळवलं होतं कि निरोप दिल्याबरोबर इंदिराजींचा चेहरा चिंताक्रांत झाला आणि तात्काळ उठून त्या चालू असलेल्या लोकसभेच्या विशेष अधिवेशनात गेल्या आणि त्यांनी सभागृहाला माहिती दिली आणि सांगितलं कि भारताची यावरील प्रतिक्रिया आणि भूमिका संध्याकाळी रामलीला मैदानावर जाहीर केली जाईल. तिकडे निक्सन आणि किसिंजर एकमेकांचे अभिनंदन करायला लागले, केक मागवला गेला. संध्याकाळी व्हाईट हाउस च्या situation room मध्ये इंदिराजींच्या भाषणाचा अनुवाद थेट फोनवर मिळेल याची व्यवस्था केली गेली. अचानक जाहीर केलेल्या पण लाखोंची उपस्थिती असलेल्या सभेत इंदिरा गांधी म्हणाल्या, "आज अमेरिकेनं धमकीवजा निरोप दिलाय कि त्यांचं 7th fleet आता भारताविरुद्ध बंगालच्या युद्धात उतरेल. अमेरिकेचा मानवी हक्कांबद्दलचा ढोंगीपणा आज उघडा झालाय पण मला त्यांना सांगायचं आहे कि भारत एकही पाऊल मागे हटणार नाही, उलट अत्यंत निकराने हे युद्ध लढेल. अमेरिका या युद्धात पडली, तर संपूर्ण जगाने पाहिलं नसेल असं यशस्वी युद्ध आम्ही लढू. बांगलादेश मुक्त होणारच". Situation room मधली अवस्था बघण्यासारखी होती. आता काय करायचं, युद्धात तर पडायचं नाहीये, नुसतं घाबरवायच होतं पण आता प्रतिआव्हानच मिळालंय, सन्मानजनक माघार तरी कशी घ्यायची याच विवंचनेत निक्सन आणि किसिंजर ची रात्र गेली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment