Sunday, 26 March 2017
काहीतरी शिकण्यासारखे... -------------------------------------------- अभिनेता दिलीप कुमार म्हणतात "जेव्हा माझं करिअर उंची वर होतं... प्रसिध्दी पदरी होती माझ्या... सगळीकडे मान, सन्मान मिळायचा.. त्या वेळचा हा जीवनप्रसंग..... एकदा मी विमानाने प्रवास करत होतो... माझ्या बाजुला एक साधा, वयाने माझ्यापेक्षा मोठा असलेला प्रवासी बसलेला होता... माणूस खुपच Simple...कपडे त्यांनी साधेचं लावलेले... Middle class असावा... पण तो प्रवासी सुशिक्षित वाटत होता... मी विमानात आहे हे लक्षात येताच इतर प्रवासी मला हात दाखवू लागले... पाहू लागले... पण माझ्या बाजुला बसलेला Gentleman... ते आपल्या कामात मग्न होते... त्यांनी माझ्याकडे लक्ष पण नाही दिलं... ते वर्तमानपत्र (Newspaper) वाचत बसलेले.. खिडकीच्या बाहेर बघत होते.... ते माझ्याशी बोलले पण नाही... बोलणं तर दूरच बघितलं सुद्धा नाही.. जेव्हा चहा प्यायची वेळ आली मीच त्यांना Smile दिली... ते पण हसून उत्साहाने मला Hello म्हणाले.. मग आम्ही बोलायला लागलो... मी सिनेमाचा विषय काढला आणि त्यांना विचारलं, "सिनेमा बघता ना?" ते म्हणाले, "हो, पण खूप कमी...खूप वर्ष झालीत शेवटचा सिनेमा पाहून.." मी म्हटलं की मी स्वतः सिनेमात काम करतो.. "अरे वाह! काय करता तुम्ही?" त्यांनी मला विचारलं.....मी अभिनेता आहे त्यांना सांगितलं... ते म्हणाले “अच्छा...छानच..” जेव्हा आम्ही पोहोचलो... विमानाच्या बाहेर निघताच... मी माझा हाथ समोर करून म्हटलं.. “खरंच, खूप छान वाटलं तुमच्या बरोबर प्रवास करून,, बाय द वे, माय नेम इज दिलीपकुमार’ त्यांनी माझ्याशी हात मिळवला आणि म्हटलं..’अरे वा.... आय अॅम जे. आर. डी. टाटा!’ त्याक्षणी मी शिकलो की, तुम्ही किती पण मोठे व्हा, तुमच्यापेक्षा नेहमीच कोणीतरी मोठं असणार... “माणसाने अहंकार न बाळगता नम्र असावं... It costs nothing” - दिलीप कुमार (अभिनेता)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment